मुंबई

मराठा समाजाचा अलिबागमध्ये ठिय्या; आरक्षणासाठी आणखी आक्रमक पवित्रा घेणार

प्रमाेद जाधव

अलिबाग : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतरही राज्य सरकारने पोलिस भरतीची घोषणा केली असून एमपीएससी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निषेधार्थ आणि अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शुक्रवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केला. पोलिस भरतीसह एमपीएससी परीक्षा तातडीने रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या वेळी कायर्य

हे वाचा : मुंबई विद्यापीठाच्या वेळापत्रकात गोंधळ

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी निर्माण केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी संस्थांना भरघोस आर्थिक निधी, मनुष्यबळ देऊन गतिमान करावे, राज्य लोकसेवा आयोगाने एसईबीसी प्रवर्गाच्या ज्या निवड जाहीर केल्या आहेत, त्या संरक्षित करण्यात याव्यात, आदी मागण्या ठिय्या आंदोलनात केल्या. 

हे वाचा : एसटी कामगारांच्या वेतनाचा तिढा कायम 

आरक्षण स्थगितीमुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रस्तावित पोलिस भरतीत मराठा तरुणांना संधी मिळणार नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक विनोद साबळे, सुनील पाटील, विनीता कांबळी, अलिबाग तालुका अध्यक्ष नरेश सावंत, राजेश लाड, हेमंत देशमुख, गणेश कडू आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
 
वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाला पाठिंबा 
मराठा समाजाने त्यांच्या न्याय हक्कासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पाठिंबा दर्शविला जात असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ यांनी पत्रकाद्वारे सांगितले. याबाबत पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.  

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 
सकल मराठा समाजाने त्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर रायगड पोलिस दलामार्फत ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामध्ये 10 पोलिस अधिकारी, 50 पोलिस कर्मचारी, 15 वाहतूक पोलिस कर्मचारी, दोन दंगल नियंत्रक पथकांचा समावेश होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : तब्बल तीन तासांच्या राजकीय गोंधळानंतर गोकुळचा निकाल जाहीर, सतेज पाटील गोकुळचे किंगमेकर

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Daler Mehndi: 'मद्य पिऊन गाऊ नका..!' उत्तराखंडच्या मंत्र्यांनी दलेर मेहंदी यांना मंचावरच विचारला जाब

SCROLL FOR NEXT